सिडनीत विराट झाला ‘हुटिंग’चा शिकार, पॉन्टिंगने प्रेक्षकांना झापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीमध्ये चौथा कसोटी सामना सुरू आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहली मैदानावर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा प्रेक्षकांच्या हुटिंगचा शिकार झाला. प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ताशेरे ओढले असून प्रेक्षकांच्या कृतीची निंदा केली आहे.

लायनला माझी विकेट बक्षिस दिली, मयांकने व्यक्त केली खदखद

गुरुवारी मयांक अग्रावल लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि विराट कोहली मैदानात उतरला. विराट मैदानात येत असताना प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. याची निंदा करताना पॉन्टिंगने म्हटले की, ‘जर प्रेक्षक हुटिंग करत असतील ते अपमानजनक आहे. मी पर्थमध्येच सांगितले होते की खेळाडूचा सन्मान करायला शिका.’

सहा वर्षापूर्वीही तसंच झालं होतं
विशेष म्हणजे 2012 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत झालेल्या कसोटी सामन्यात विराटला हुटिंगचा सामना करावा लागला होता. यावेळी विराटने प्रेक्षकांकडे पाहून मधले बोट दाखवले होते. त्यामुळे त्याच्यावर आयसीसीने कारवाई करत त्याला 50 टक्के सामना फी दंड म्हणून ठोठावला होता.