
एका महिलेने तिच्या नवऱ्याला वाढदिवसानिमित्त तिहेरीची threesome भेट द्यायचे ठरवले होते. थेरेसा रोझ असं या महिलेचं नाव असून ती ओरेगॉन पोर्टलँडची रहिवासी आहे. थेरेसाचं लग्न झाल्यानंतर संसारात फार मन रमत नव्हतं. असं का होतं, याचा तिला अनेकदा प्रश्न पडायचा. या प्रश्नाचं उत्तर तिला नवऱ्याच्या वाढदिवसाला मिळाले होते. आपण समलिंगी असल्याचं lesbian थेरेसाला त्यादिवशी कळालं होतं.
2020 साली थेरेसाने तिच्या नवऱ्यासोबत रात्री गंमत करत असताना मजा म्हणून आणखी एका महिलेला बोलावले होते. तिघांनी मिळून गंमत करायचं असं थेरेसाने ठरवलं होतं. जी महिला त्यांच्यासोबत आली होती तिला पाहताक्षणीच थेरेसाला आकर्षित झाल्यासारखं आणि छान वाटायला लागलं होतं. नवऱ्यासोबत आपल्याला असं कधीच वाटलं नाही, त्याच्यासोबतचे संबंध हे मानसिकदृष्ट्या उथळ स्वरुपाचे होते पण या महिलेत आपण पहिल्याच भेटीत खोलवर गुंतल्याचं थेरेसाला वाटलं होतं. त्याच क्षणी थेरेसाला कळालं की ती समलिंगी आहे. या घटनेच्या काही दिवसांतच तिने नवऱ्याला घटस्फोट दिला आणि जॅक्वी मेटल नावाच्या महिलेसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले.

थेरेसाचं कुटुंब कॅथलिक होतं. समलिंगी नरकात जातात अशी तिला लहानपणापासून शिकवण देण्यात आली होती. यामुळे घाबरून तिने आपल्या भावना कधीच व्यक्त केल्या नाहीत आणि कालांतराने आपल्या भावना नेमक्या काय आहेत याचाच तिला विसर पडला होता. थेरेसाने आपण लेस्बिअन असल्याचं नवऱ्याला सांगितलं तेव्हा त्याने तिला तिच्या पाठिंबा दिला नव्हता. यामुळे तिने त्याच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला. नवऱ्याप्रमाणे थेरेसाच्या अनेक नातेवाईकांनी तिच्या लेस्बिअन असण्याला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. जॅक्वी मेटलशी भेट झाल्यानंतर आपल्या आयुष्यात गोष्टी बदलत गेल्या असं थेरेसाने सांगितलंय. जवळपास एक वर्ष दोघी सोबत राहात आहेत. थेरेसाची दोन्ही मुलं ही देखील आता त्यांच्यासोबत राहात असून या दोघी मिळून त्यांचं पालनपोषण करतायत.




























































