
राज्यात 6 जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशव राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा दिवस स्वराज्याची सार्व भौमत्काची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिकस्कराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या दिवशी सर्व ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषदांच्या कार्यालयांत भगव्या स्कराज्यध्वजासह शिवशव राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






























































