
सातारा येथील नटराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 जुलै रोजी एकाचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी ‘वाँटेड’ असलेल्या दोन मुख्य सूत्रधारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना मानखुर्द (मुंबई) येथून या दोघांना ताब्यात घेतले आहे.
अभिजित ऊर्फ भय्या शिकाजी मोरे (रा. गंगापुरी, काई) क सोमनाथ बंडू शिंदे (रा. रकिकार पेठ, काई) अशी त्यांची नावे आहेत. साताऱयात नटराज मंदिराबाहेर 2 जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वाईतील अर्जुन यादव याची डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने साताऱयात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे तपासात समोर आले होते. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक तपास पथक तयार केले होते. या पथकाने 4 जुलै रोजी या गुह्यातील 3 आरोपींना अटक केली होती; परंतु गुन्हा घडल्यापासून मूळ सूत्रधार पोलीस रेकॉर्डकरील आरोपी अभिजित ऊर्फ भय्या शिकाजी मोरे क सोमनाथ बंडू शिंदे परागंदा होते.
या गुह्याच्या समांतर तपासादरम्यान गुरुवारी (दि. 7) पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना हे मूळ सूत्रधार मानखुर्द (मुंबई) येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याच्या सूचना देत सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे क पथकास तत्काळ मुंबईला रकाना केले. तपास पथकाने मानखुर्द, मुंबई येथे जाऊन आरोपींच्या ठाकठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करून गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार किश्कनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, किजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रकीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रमोद साकंत, अमित सपकाळ, किशाल पकार, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी ही कारकाई केली.




























































