>> योगेश जोशी
दिनविशेष – बुधवारी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असून हर्षण योग आहे. कार्तिक शुद्ध दशमी आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज मिथुन, कर्क, वृश्चिक, धनू आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.
राहू काल – दुपारी 12.00 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होत असल्याने आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. कार्यक्षेत्रात कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. नात्यातील दूरावा, गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. कोणताही आजार अंगावर काढू नका. वैद्यकीय सल्ला योग्यवेळी घेणे फायद्याचे ठरेल. घरातील वातावावरण खेळीमेळीचे राहील.
वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानात असल्याने आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करावे लागेल. कार्यक्षेत्रात सहकारी मदत करतील. जमाखर्चाचा ताळमेल साधल्यास आजचा दिवसात खर्च आटोक्यात राहतील. उधारउसळवारी टाळावी आणि आर्थिक व्यवहारात दक्षता ठेवावी. भविष्यासाठी गुंतवणुकीची योजना यशस्वी होईल. भविष्यातील योजनांना गती मिळणार आहे. कुटुंबियांची चांगली साथ मिळणार असल्याने घरातील वातावरण उत्साहाचे असेल.
मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस सकारात्मक असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानात होणार असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. सामाजिक कार्यात प्रभाव वाढणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या योजनांना यश मिळणार आहे. व्यापारातही लाभाचे योग आहेत. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. लाभ होत असल्याने घरातील वातावरण आनंदी असेल.
कर्क
कर्क राशीला आज नशीबाची साथ मिळणार आहे. चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानात होत असल्याचे लाभ मिळणार आहेत. कार्यक्षेत्रात एखादा शुभसमाचार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या घटनेने मनस्ताप होऊ शकतो. व्यावसायिकांना आज यशाचा दिवस आहे. परदेशातून एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीला आज सावध राहण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण आठव्या स्थानातून होत असल्याने हातून चुका होण्याची शक्यता आहे. तसेच जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवत वाणीत गोडवा ठेवण्याची गरज आहे. शेअर मार्केट आणि आर्थिक व्यवहारांपासून आजचा दिवस दूर राहणेच फायद्याचे ठरणार आहे. सरकारी कामात चालढकल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराशा होण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानातून होणार असल्याने जोडीदाराची साथ मिळेल. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना अनेक चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात आपले काम पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल, अन्यथा कामात विलंब होणार आहे. मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. अविवाहितांना चांगले प्रस्ताव येण्याचे योग आहेत.
तूळ
तूळ राशीला आज प्रत्येक कामात दक्षता घ्यावी लागणार आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानातून होत असल्याने कामाचा व्याप वाढलेला असेल. दगदग, धावपळ केल्यास मनस्ताप वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आजचा दिस फायद्याचा ठरणार आहे. कुटुंबात कुरबुरी वाढण्याची शक्यता असल्याने संयमानेच निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे रागाने कोणतीही प्रतिक्रिया देण्याएवजी शांततेने समस्येवर मात करता येईल.
वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण पचंम स्थानात होत असल्याने एखाद्या महत्त्वाच्या कामातील लक्ष्य नजरेत येणार आहे. त्यामुळे घरात सुखसमृद्धीचे वातावरण असेल. एखद्या चुकीमुळे कार्यक्षेत्रात वाद होऊ शकतात. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही काम दुसऱ्यावर सोडल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. कटुंबिय आणि मित्रांसह दिवस मजेत जाणार आहे. मात्र, विनाकारण वाद टाळणे गरजेचे आहे.
धनू
धनू राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानात होत असल्याने कुटुंबियांसह वेळ घालवता येईल. वाहन किंवा गृहखरेदीची योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. मामत्तेबाबत कोणत्याही गोष्टीला मंजुरी देण्याआधी विचार करा, अन्यथा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठांकडे लक्ष द्यावे लागेल, त्यांचे म्हणणे समजणे गरजेचे आहे. अन्यथा कुटुंबा नाराजी वाढण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मनसीक तणावातून सुटका होणार आहे.
मकर
मकर राशीला आजचा दिवस चांगला आहे. सामाजिक कार्यात असलेल्यांना मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. मात्र, विनाकारण वेळ न दवडता कामांकडे लक्ष देत ती हातावेगळी करावी लागणार आहेत. कामानिमित्त छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. आळशीपणामुळे कामांचा व्याप वाढणार आहे. कुटुंबातील समस्या सोडवून त्यातून मार्ग काढण्यावर भर राहील. त्यात चांगले यश मिळणार आहे. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल.
कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस आनंदाचा असेल. चंद्र द्वितीय स्थानात असल्याने मनावरील दडपण कमी झाल्यासारखे वाटेल. तसेच अचानक लाभाचे योगही आहेत. कुटुंबासोबत लहान पिकनिकचा बेत ठरू शकतो. त्यामुळे घरातही आनंदी वातावरण असेल. आजच्या दिवशी एखाद्याला दिलेल्या सल्ल्याने त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या शब्दाचे वजन वाढणार आहे. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
मीन
मीन राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानात होत असल्याने अनेक योजना दृष्टीपथात येतील. तसेच एखादे नवे काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. सजनात्मक गोष्टींकडे कल वाढणार आहे. काही हितशत्रू करावाया करण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष ठेवल्यास आजचा दिवस समाधानात जाणार आहे.