
अमेरीकेचे पहिले खाजगी चंद्रमोहीम फेल झाले आहे. लॅंडरमध्ये आलेल्य़ा तांत्रिक बिघाडामुळे खासगी चंद्रमोहीमेला अपयश आले आहे. खासगी कंपनी अॅस्ट्रोबोटिकने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले आहे. रॉकेटच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कंपनीने सांगितले की, हे लँडर आता चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकणार नाही. त्यामुळे अमेरीकेचा 51 वर्षानंतरचा प्रयत्न फोल ठरला आहे.
अमेरीकेने 51 वर्षानंतर मून मिशन लॉन्च केले होते. ज्यासाठी खाजगी क्षेत्रातही बऱ्याच अपेक्षा होत्या. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे अमेरिकेचे पहिले खासगी मिशन अयशस्वी ठरल्याचे मिशनशी जोडलेल्या लोकांनी सांगितले. अॅस्ट्रोबोटिक कंपनीने या लँडरची निर्मिती केली असून त्यांच्या मते फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून युनायटेड लॉन्च अलायन्स रॉकेट वल्कनवर लँडर लॉन्च करण्यात आले. मात्र लॉन्च केल्याच्या 7 तासांनंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडर मोहीम फेल ठरली आहे. कंपनीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Update #9 for Peregrine Mission One: pic.twitter.com/nRxfvNivwm
— Astrobotic (@astrobotic) January 9, 2024
वृत्तानुसार, रॉकेट इंजिनमध्ये बिघाड हे मिशन फेल झाल्याचे सांगितले जात आहे. रॉकेटमध्ये आता 40 तास पुरेल एवढे इंधन शिल्लक असल्याने ते सॉफ्ट लँडिंग आता शक्य नाही. अमेरीका सरकारनेही या मिशनला पाठिंबा दिला होता आणि कंपनीला सुमारे 100 दशलक्ष डॉलर दिले. त्यानंतर अॅस्ट्रोबॉटिक कंपनीचे सीईओ म्हणाले की, मोहीम यशस्वी झाल्यास खासगी कंपनीचे चंद्रावर पहिले सॉफ्ट लँडिंग असेल. यापूर्वी अमेरिकेने 1972 मध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले होते. त्यानंतर अपोलो 17 चंद्रावर उतरले आणि अमेरिकेने ध्वज फडकावला. मात्र 51 वर्षांनंतर अमेरिकेचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.






























































