
बदलापूर पूर्व येथील भाजप महिला अध्यक्षाच्या मुलीनेच प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल गलिच्छ आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. मृणाल जाधव असे तिचे नाव असून तिला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. प्रभू रामचंद्रांची विटंबना केल्याबद्दल बदलापुरात कडकडीत बंदही पाळण्यात आला. मृणाल जाधव ही बदलापूर पूर्व येथील भाजप महिला अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी आहे.



























































