
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षातील बंडखोर नेत्यांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘एकनाथ शिंदे मॉडेल’ राबवले जात असून तृणमूल काँग्रेसचे काही आमदार भाजपसमोर शरणागती पत्करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चौधरी म्हणाले, “जे लोक नवीन पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापैकी बहुतेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते भाजपसमोर शरणागत होत आहेत. यामुळे ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करणे कठीण होईल.”
पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातील ‘एकनाथ शिंदे मॉडेल’ची पुनरावृत्ती होत असल्याचा दावा करत चौधरी म्हणाले की, “टीएमसीचे काही आमदार भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असतील, मात्र मुस्लिम समाज त्यांना तसे करू देणार नाही. त्यामुळे अनेक आमदार संभ्रमात आणि भीतीच्या वातावरणात आहेत” असेही चौधरी म्हणाले.
#WATCH | Murshidabad, West Bengal: On TMC’s leaders leaving TMC, Congress leader Adhir Ranjan Chowdhury says, “They are surrendering in front of the BJP. All the elected representatives who are trying to make a new party have at least one accusation of corruption against them…… pic.twitter.com/hmdIVyUxVI
— ANI (@ANI) June 3, 2026

























































