
मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला असून कांगपोकपी जिह्यातील लोइबोल खुल्लेन गावात वस्तीवर केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी गावातील सात घरेही पेटवून दिली. गाव गाढ झोपेत असताना सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवला. त्यानंतर दोन गटांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यात लेटखोंगम हाओकिप, टिनमैरी हाओकिप आणि जांगमिनलाल हाओकिप या तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याने भयभीत झालेल्या अनेक गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात आश्रय घेतला.






























































