
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निकोबार बेटावर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. त्याचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करत त्यांनी मोदी सरकारच्या ग्रेट निकोबार प्रकल्पावर निशाणा साधला. लाडक्या उद्योगपतीच्या फायद्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. या बेटांवर हॉटेल पॅसिनो उभारण्याचा डाव आहे. अंदमान-निकोबारचा विनाश टाळण्यासाठी मी पूर्ण ताकद लावेन, असे राहुल यांनी ठणकावले.






























































