सीबीएसई बारावीच्या पुनर्मूल्यांकनासाठी मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसईने बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 6 जूनऐवजी आता 7 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पोस्ट-रिझल्ट सर्व्हिसेस पोर्टलद्वारे एकूण 70,433 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 7,314 गुणांच्या पडताळणीसाठी आणि 63,119 पुनर्मूल्यांकनासाठीचे अर्ज समाविष्ट होते.  सीबीएसईने 2 जून रोजी निकालानंतरच्या समस्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पाहताना आणि पडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना अनेक अडचणी येत असल्याची तक्रार केली होती. बोर्डाने पोर्टलवरील सायबर हल्ल्यांच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.