
नीट परीक्षेच्या नियोजनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा कापर झाला असता, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशा शब्दात राष्ट्रकादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सरकारचे कान टोचले.
सध्या या प्रकरणाची जबाबदारी ज्या व्यक्तीकडे आहे, त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. ते अत्यंत प्रामाणिक व सक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या कामाचे सकारात्मक परिणाम येत्या दोन महिन्यांत दिसून येतील, असा किश्वासही शरद पवार यांनी क्यक्त केला.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहचवणाऱया ‘टेलॉजी ऑन व्हील्स’ या उपक्रमाचे उद्घाटन शरद पवार यांच्या उपस्थितीत आज झाले.उद्योगपती प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे, विवेक सावंत यावेळी उपस्थित होते.
शिक्षण, आरोग्य, शेती क्षेत्रात एआयने प्रचंड बदल केला आहे. शेती हा हिंदुस्थानचा आर्थिक कणा असून शेतीमध्ये नेहमी प्रमाणे जी पिके घेतली जातात. त्या तुलनेत एआयच्या मदतीने जी पीके घेतली जातात त्या पिकांच्या उत्पन्नात आणि क्वॉलिटीमध्ये खुप मोठय़ा प्रमाणात फरक दिसून आला आहे. त्यामुळे प्रशासनानेही या तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढवण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.


























































