
देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे हा निर्णय करण्याचा अधिकार कोणाला नाहीये. मुख्यमंत्री फडवणीस यांना विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून देशातील सर्वात अव्वल राज्य तयार करायचे आहे. फडवणीस दिल्लीत जातील हा विचार सोडून द्या, असा प्रेमाचा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना दिला आहे.
शिंदे गटाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जशी भाजपची मागणी असते फडणवीस मुख्यमंत्री व्हावे तशीच आमची मागणी असते, असे सांगत कडू यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. त्यावर बावनकुळे यांनी असे खडे पह्डून मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका व्यक्त करू नयेत, असा टोला शिंदे गटाला लगावला.
काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून मांडायला पाहिजेत असं समन्वय समितीमध्ये ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये ठरलेला निर्णय कोणी पाळत नसेल तर त्यावर चर्चा करू, असे बावनकुळे म्हणाले.



























































