
अमेरिकेतील उद्योगपती आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या रॉकेट कंपनीचा आयपीओ जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. यामुळे मस्क हे जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ बनले आहेत. परंतु आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यावर चिंता व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपल्याला स्वप्ने दाखवली जात आहेत आणि पैशांची उपलब्धता सहज असलेल्या या काळात आपण ती स्वप्ने विकत घ्यायला तयार आहोत. प्रश्न हा आहे की, ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील का?
आपल्याला स्वप्ने दाखवली जात आहेत आणि पैशांची उपलब्धता सहज असलेल्या या काळात आपण ती स्वप्ने विकत घ्यायला तयार आहोत. प्रश्न हा आहे की, ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.
जगातील सर्वात मोठय़ा आयपीओनंतर स्पेसएक्सच्या मूल्यांकनात झालेली प्रचंड वाढ पाहता मला आजची नाही, तर भविष्याची अधिक चिंता वाटते. कारण महागाईचे संकट असतानाही आर्थिक परिस्थिती सुलभ राहिली आहे. तुम्हाला माहीतच आहे की, गेल्या 5 वर्षांत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला महागाईचा दर त्यांच्या उद्दिष्टाच्या आसपासही आणता आलेला नाही.
सध्याची चर्चा हीच आहे की, आर्थिक धोरणे अधिक शिथिल करायची की कमी शिथिल करायची? त्यामुळे मला काळजी वाटते, कारण जेव्हा पैसा सहज उपलब्ध असतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होत असतात आणि त्या समस्या कालांतराने समोर येतात, असे रघुराम राजन म्हणाले.
n स्पेसएक्सचे अनेक विभाग सध्या तोटय़ात आहेत. काही विभाग नक्कीच नफा कमवत आहेत. पण असे अनेक विभाग आहेत जे नफा कमवत नाहीत. अशा परिस्थितीत आपण अशा एका कंपनीचे मूल्यमापन 2 ट्रिलियन डॉलर्स इतके करत आहोत, जी प्रामुख्याने भविष्यातील शक्यतांवर जसे की चंद्रावर किंवा मंगळावर खाणकाम करणे यावर आधारित आहे.























































