
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरण उघडकीस आणल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्यात येत आहे. आता या प्रकरणी अखिलेश यादव यांनी सरकारला आणि एसआयटीला जबरदस्त टोला लगावला आहे. या प्रकरणाचा तपास अहवाल चोरीला जाणार नाही याची काळजी घ्या. राम मंदिर देणगी घोटाळ्याचा चौकशी अहवाल चोरीला जाऊ नये, हीच अपेक्षा! असे म्हणत त्यांनी टोला हाणला आहे.
अयोध्या राम मंदिर देणगी वादाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून त्याचा तपास सुरू झाल्यानंतर, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकार आणि तपास यंत्रणेवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचे पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांनी एसआयटीच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. त्यांनी तपास यंत्रणेला इशारा दिला आहे की एसआयटीने खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, तपास अहवालच गायब होऊ शकतो किंवा चोरीला जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
ते आणखी १५ दिवस थांबायला सांगतील. ते पुरावे लपवत असल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक प्रमुख लोकांची नावे गुंतलेली असल्यामुळे सरकार आणि प्रशासन पूर्णपणे गप्प आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.























































