
संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आले असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दुर्मिळ दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचे जतन व संवर्धन करणार आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी विधान परिषद सभागृहात निवेदन सादर केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १५० दुर्मिळ छायाचित्रे व त्यामध्ये भाग घेतलेले नेते, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. या मुलाखतींची संख्या ३५ एवढी असून त्यांचा कालावधी सुमारे १ हजार २५८ मिनिटे आहे. ‘टू वुमन्स रिपोर्ट’ मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इत पत्रव्यवहार आदी दस्तऐवजाचा समावेश आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास महाराष्ट्राच्या अस्मितेची अमूल्य संपत्ती आहे कुमार कदम यांनी जतन केलेला १२०-मिनिटांहून अधिक कालावधीचा दुर्मिळ ध्वनिदस्तऐवज शासनाच्या संग्रहात येत असतान राज्यातील संस्था, राजकीय पक्ष आणि व्यक्तींक असलेले ठराव, छायाचित्रे, पत्रव्यवहार व अन् ऐतिहासिक दस्तऐवजही शासनाकडे सुपू करण्याचे आवाहन आशीष शेलार यांनी केले महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा अमूल्य वारस एकत्रित करून भविष्यात त्याचे भव्य दाल उभारण्याचा शासनाचा विचार आहे, असेह ते म्हणाले. त्यांनी मांडलेल्या निवेदनाती उपक्रमाला शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांच्यासह सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.



























































