धोकादायक दरडींपासून बचावासाठी म्हाडा संरक्षक भिंत उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात दरडप्रवण क्षेत्रात व डोंगरउतारांवर राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रहावे लागते. या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी म्हाडाने पंबर कसली असून ठिकठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.

मुंबई शहरात वरळी, भायखळा, शिवडी, डोंगरी, मस्जिद बंदर, शीव, मलबार हिल परिसरात तर उपनगरात घाटकोपर, कुर्ला, चांदिवली, मुलुंड, मालाड, दिंडोशी, गोरेगाव, भांडुप या परिसरात डोंगराच्या ठिकाणी असलेल्या झोपडय़ांना पावसाळ्यात दरडीचा धोका असतो. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून प्रचंड जीवित आणि वित्तहानी होते. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक असलेल्या दरडीच्या ठिकाणांचा शोध घेऊन संरक्षक भिंत उभारण्याचे काम मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती घेतले आहे.

मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय म्हणाले, मुंबई शहरात 39 संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली असून त्यापैकी 28 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित आठ कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच मुंबई उपनगरात 97 संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली असून त्यापैकी 72 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 25 कामांचे बांधकाम सध्या सुरू आहे.

वांद्रे सी लिंक आणि अटल सेतूला जोडणाऱ्या प्रभादेवी पुलाचा 33 मीटर गर्डर पिलरवर चढवण्याची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मध्यरात्री हा गर्डर पिलरवर चढवला जाईल.