
झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यामध्ये एका सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली. या एकमात्र कसोटी सामन्यात झिम्बाब्वेने आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत बांगलादेशला दिवसा तारे दाखवले आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर झिम्बाब्वेने बांगलादेशला चारीमुंड्या चित केलं आणि एक डाव आणि 85 धावांच्या अतंराने पराभवाची धुळ चारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात झिम्बाब्वेचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तसेच तब्बल 25 वर्षांनी झिम्बाब्वेने बांगलादेशला कसोटी मालिकेत एक डाव राखून लोळवलं आहे.
हरारेमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशच पारडं जड मानलं जात होतं. मात्र, पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव गडगडला. झिम्बाब्वेने केलेल्या घातक माऱ्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ 140 धावांमध्येच बाद झाला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने बांगलादेशी गोलंदाजांना चांगलंच धुवून काढलं आणि आपल्या पहिल्या डावात 410 धावांचा डोंगर उभा केला. 270 धावांची आघाडी घेत झिम्बाब्वेने बांगलादेशला फॉल-ऑन साठी आमंत्रित केलं. बांगलादेशला या संधीचा लाभ घेत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र, झिम्बाब्वेने पुन्हा एकदा आपल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला शांत केलं. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संपूर्ण संघ 185 धावांमध्ये गार झाला आणि झिम्बाब्वेने सामन्यास कसोटी मालिका जिंकली.
झिम्बाब्वेने या सामन्यात बांगलादेशचा एक डाव राखून 85 धावांनी पराभव करत कसोटी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 25 वर्षांनी झिम्बाब्वेने सलग दोन कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच हा त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. दोन्ही वेळा बांगलादेशला (2001) झिम्बाब्वेने धूळ चारली आहे. झिम्बाब्वेने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये आतापर्यंत फक्त 16 सामने जिंकले असून यापैकी 9 सामने त्यांनी बांगलादेशविरुद्ध जिंकले आहेत.





























































