
मराठी नाटकांना नेहमीच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आलेला आहे. त्यामुळे अनेक नाटके ही हाऊसफुल होतात, परंतु काही नाटय़गृहांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. तांत्रिक बिघाड, अस्वच्छ शौचालय, मेकअप रूमची अस्वच्छता अशा अनेक अडचणींना कलाकारांना सामोरे जावे लागते ही खरी वस्तुस्थिती आहे, असे विधान रंगकर्मी अतुल पेठे यांनी केले आहे.
नाटक पाहायला येणाऱया प्रेक्षकांची एकाग्रता अजिबात कमी झालेली नाहीये. मी ‘आषाढातील एक दिवस’ हे तीन अंकी नाटक केलेय. चंद्रकांत कुलकर्णींनी ‘चारचौघी’ हे तीन अंकी नाटक केले. लोकांनी तीन-तीन तास बसून याचे प्रयोग पाहिलेत. जर तुमचा पंटेट चांगला असेल तर लोक तुमचे प्रयोग नक्कीच पाहतात. आपले प्रामाणिक प्रयत्न असतील तर प्रेक्षकांपर्यंत ते निश्चितच पोहोचतात. प्रेक्षक अतिशय सुजाण असतात. चांगल्या नाटकांची अशी अनेक उदाहरणे आहेत, पण प्रत्येक प्रायोगिक नाटक प्रेक्षक डोक्यावर घेतील असंही नाहीये. कारण त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. लोकांचं ट्रेनिंग नीट झालंय का? ज्या गावात आपण नाटक सादर करतोय तिथे सुविधा आहेत का? सुखसोयी आहेत का? आता अनेक गावांत दिवेही नसतात, बसायला खुर्च्या नाहीत तर हे लोक नाटक कसे पाहतील?
एक साधं उदाहरण सांगतो, आता गावागावांत एसी बार आहेत. तिथे म्युझिक सुरू असतं, सुंदर इंटिरिअर आहे, बसायला गुबगुबीत गाद्या आहेत. लोकांचा विचार करून या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मग हाच विचार नाटय़गृहांच्या बाबतीत का केला जात नाही, असेही ते म्हणाले.
ज्या गावात आपण नाटक सादर करतोय तिथे सुविधा आहेत का? सुखसोयी आहेत का? आता अनेक गावांत दिवेही नसतात, बसायला खुर्च्या नाहीत तर हे लोक नाटक कसे पाहतील?





























































