
चांदोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रात अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या 24 तासांत 55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत परिसरात संततधार पाऊस सुरू होता. या मुसळधार पावसामुळे धरण परिसरासह आजूबाजूच्या भागांत वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱयांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजअखेर चांदोली धरण परिसरात एकूण 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये एकूण 11. 38 टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त साठा 4.50 टीएमसी आहे.
सध्या धरण 16.34 टक्के भरले आहे. शेतकऱयांनी यापूर्वी पेरणी केलेली खरीप पिके आता या पावसामुळे जोमाने वाढू लागली आहेत.





























































