पनवेलमध्ये पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतेची बोंब सर्वांगीण सुविधा तातडीने पुरवा; शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल शहरात पाणी पुरवठा योजना, आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात सर्वांगीण सुविधा तातडीने पुरवाव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्राला अनेक प्राधिकरणांकडून पाणी पुरवठा केला जातो, मात्र तरीही शहराला नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत असलेल्या पनवेल शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकास, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी केली आहे.

 

पनवेलकरांसाठी शाश्वत पिण्याच्या पाण्याचा आराखडा जाहीर करण्यात यावा. शिलार धरण, देहरंग धरणाची उंची वाढवण्यात यावी, नवीन जलस्रोतांचा शोध घेण्यात यावा, जलशुध्दीकरण प्रकल्प उभा करण्यात यावेत, आदी सूचना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी यावेळी पालिका प्रशासनाला केल्या.

 

कोलमडल्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वच रुग्णालयांत आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्याचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. या गलथान कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उपनेते बबन पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी पालिकेवर धडक दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महापालिकेतील गटनेत्या लीना गरड, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, अजय पाटील, कैलास पाटील, माजी सरपंच सुनील पाटील, सिद्धेश चव्हाण, तुषार निढाळकर आदी उपस्थित होते.