
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या घटना तसेच इतर नैसर्गिक व रासायनिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची एक विशेष तुकडी रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. या पथकात ३० जवानांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात मदत व बचाव कार्याची आवश्यकता भासल्यास एनडीआरएफची तुकडी तातडीने घटनास्थळी रवाना होणार असून प्रशासनाशी समन्वय साधून बचाव कार्य राबवणार आहे. सद्यस्थितीत एनडीआरएफचे मुख्यालय महाड येथील रमाबाई आंबेडकर विहार येथे आहे. या तुकडीकडे पूरग्रस्त भागात बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक साहित्याची उपलब्धता आहे. यामध्ये होड्या, पिकअप वाहन, फावडे, कटर, जॅक, दोरखंड तसेच विविध प्रकारची शोधकार्याची जबाबदारी ‘सेंट्रो’ वर एनडीआरएफच्या पथकात शोध व बचाव कार्यासाठी प्रशिक्षित ‘सेंट्रो’ या श्वानाचाही समावेश करण्यात आला आहे. दरड कोसळणे किंवा ढिगाऱ्याखाली व्यक्ती अडकल्यास त्यांचा शोध घेण्यासाठी या श्वानाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
बचाव उपकरणे समाविष्ट आहेत. पूर, दरड दुर्घटना किंवा रासायनिक अपघात झाल्यास या उपकरणांच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे तसेच आवश्यक ते मदतकार्य केले जाणार आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही एनडीआरएफचे निरीक्षक सुशांत शेट्टी यांनी केले.




























































