अयोध्येतील अंडरवर्ल्डचा दाऊद इब्राहिम कोण आहे? राम मंदिर देणगी प्रकरणी संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने अयोध्येत चोराचं आणि दरोडेखोरांच राज्य सुरू केले आहे, दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले. अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आज अयोध्येची अवस्था अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही. अयोध्येतील अंडरवर्ल्डचा दाऊद इब्राहिम कोण आहे हे अयोध्येत जाऊन सांगणार असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू आहे. पक्ष बदलला की गुन्हे रद्द होतात. त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. माधव जामदार यांनी केली. यावर संजय राऊत म्हणाले की, उच्च न्यायालयाची टिप्पणी ऐकून आणि वाचून मी रोमांचित झालो. कुणाचा तरी आत्मा जागा आहे, न्यायासनावर बसलेले कुणीतरी रामशास्त्री आहे. जो उघडे डोळे ठेवून आपल्या समोर काय वातावरण आहे, यावर परखड भाष्य करत आहेत. आणि अशा ज्या काही प्रमुख व्यक्ती आहेत, त्यांच्यामुळे देशाचे संविधान आणि लोकशाही टिकेल. अमित शहा विरुद्ध जर तडीपारी होत असेल तर या देशात लोकशाही आहे असे म्हणता येणार नाही. फक्त विरोधकांवार गुन्हे दाखल करायचे, त्यांना तडीपार करायचे. माझ्यासोबत सध्या आंबेगावचे सूरज भोर सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आहेत. आंबेगावात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे आंबेगावात बिबट्यांविरोधात सर्वपक्षीय आंदोलन झाले आहे. त्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचेही नेते होते. पण त्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 200 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. दिलीप वळसे पाटील यांनी हे गुन्हे दाखल करायला लावले आहेत. त्यांच्याही पक्षाचे लोक आंदोलनात होते, हा सामाजिक विषय आहे. हा समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याचा निषेध करावा तितका कमी आहे. काल न्यायमूर्ती जामदार यांनी जी टिप्पणी दिली ती या देशाला दिलासा देणारी आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही दिवे पेटलेले आहेत. सगळीकडे अंधार नाही. कुठेतरी आशा आहे. न्यायमूर्तींनी जे दुःस्वप्न सांगितले त्यातून आम्ही सगळे जात आहोत. विरोधकांना नष्ट करणं, सत्ताधाऱ्यांना टीका केली की शिवसैनिकांना तुरुंगात टाकणं, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेणं. ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये नाही जायचं त्यांना तुरुंगात टाकायचं. या सगळ्यावर उत्तम प्रकारची टिप्पणी न्यायव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या व्यक्तीने करावी, याचा अर्थ देश आणि देशाचा आत्मा जागा ठेवणारी माणसं अजूनही न्यायव्यवस्थेत आहेत. सर्व काही संपलेलं नाही, आशा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

या देशाला कलंकित करणाऱ्या घडणाऱ्या घटना अयोध्येत घडत आहेत. ज्या अयोध्येच्या आंदोलनाने प्रभू श्री रामाच्या प्रतिष्ठेने या देशाची अस्मिता चमकून निघाली होती. तिथे आज स्वतःला हिंदुत्ववादी मानणाऱ्यांनी जो रामाचा ताबा घेतला, अयोध्येचा अंडरवर्ल्ड केलं. आज अयोध्येची अवस्था अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही. भाजपने अयोध्येत चोराचं आणि दरोडेखोरांच राज्य सुरू केले आहे. दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले. ही लुटमार करणारे लोक भाजपसंबंधित लोक आहेत. लोकांच्या मनात अस्वस्थता आणि चीड आहे, पण व्यक्त करायला घाबरत आहेत. बृजभूषण सिंह आणि बागेश्वर धाम म्हणाले की बोललो तर आमचे प्राण जातील एवढी दहशत आहे. अयोध्येचा अंडरवर्ल्डचा दाऊद इब्राहिम कोण आहे? बृजभूषण सिंह घाबरले तरी मी घाबरलेलो नाही. अयोध्येत जाऊन सांगणार तिथला दाऊद कोण आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे आणि या विषयावर संवाद साधणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ही संपूर्ण देशाची भावना आहे. पण सर्वोच्च न्यायालय निष्पःक्ष आहे का? सर्वोच्च न्यायालयही केंद्र सरकाच्या अखत्यारित काम करत आहेत. मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार यांच्या निगराणीखाली तपास व्हायला हवा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.