
मुंबईत दोन मृत्यू झाले, पण मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम निर्लज्जपणे काल एक झाडात एक माणूस मेला, एक मॅनहोलमध्ये गेला असं हसून निर्लज्जपणे दात काढून व्यंग काढून हसतोय, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच या पक्षाचा अंतरआत्मा किती क्रूर आणि विकृत आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषद संजय राऊत म्हणाले की, मुंबईत दोन मृत्यू झाले. अनेक जण जखमी झाले. आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम निर्लज्जपणे काल एक झाडात एक माणूस मेला, एक मॅनहोलमध्ये गेला असं हसून निर्लज्जपणे दात काढून व्यंग काढून हसतोय. ही विकृती आहे. या पक्षाचा अंतरआत्मा किती क्रूर आणि विकृत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी संवेदनशीलता शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब हाकलून दिले पाहिजे. एक तर तुम्ही नालेसफाई केलेली नाही. तुम्ही झाडांसदर्भात तक्रारींकडे लक्ष दिले नाही. ही धोकादायक झाडं कापली नाही म्हणून 11 वर्षाच्या मुलाचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबींयाचा आक्रोश सुरू असताना तुम्ही हसताय, लाज नाही वाटत. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे. काहीही झालं तर शिवसेनेवर ढकलायचं. गेली वर्षभर प्रशासन तुमच्या हातात होतं. तीन महिन्यांपासून तुमच्या हातात पालिका आहे. पालिकेत ठेकेदारांचे राज्य सुरू आहे. 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेले केला आहे. हे वरचे 4 टक्के कुणाचे कमिशन आहे? मुंबई तुंबली आहे, नालेसफाई कुठे झाली आहे? अदानीच्या मदतीने तुम्ही काही तरी करायला निघाला होतात. मुंबईत माणसं वाहून जात आहेत, गाड्या तरगंत आहेत. अमिताभ बच्चनच्या घरात पाणी गेलेलं आहे. पाणी आलं म्हणून बिग बी खाटेवर पाय वर करून बसलेले आहेत. आणि माणसं मेल्यावर निर्लज्जपणे हसत आहेत. याच लोकांनी राम मंदिर लुटलं. चाटम सारख्या विकृत लोकं अयोध्येत आहेत. आणि यांच्यामुळेच राम मंदिर लुटलं गेलं. इथे मुंबईच्या जनतेची तिजोरी लुटली, तिथे राम मंदिर लुटलं, असे संजय राऊत म्हणाले.
निष्पाप माणसांच्या मृत्यूवर दात काढून हसणारा जगातला सर्वात मोठा निर्लज्ज आणि खुनी राजकीय पक्ष! चाटम लेकाचे!
@ShelarAshish pic.twitter.com/Z379TwgooE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 3, 2026
मुंबईत झालेल्या या घटनांप्रकरणी नगरविकास मंत्र्यांना हटवायला पाहिजे. नगरविकास मंत्र्याचेच मुंबईत उपमहापौर आहेत. ते म्हणतात की आयुक्तांना हटवा. आयुक्त हे IAS अधिकारी आहेत. या मुंबई महापालिकेत जे ठेकेदारांचे राज्य सुरु आहे, ते राजकारण्यांमुळे झाले आहे. हे ठेकेदारांचे राज्य मोडून काढता आले नाही हे आयुक्तांचे अपयश आहे. मुलुंडचे नागडे पोपटलाल महापालिकेत जातात आणि बांगलादेशींना हटवा अशा घोषणा देतात. हे काय महानगरपालिकेचे काम आहे का? बांगलादेशींना हटवणं हे अमित शहांचं काम आहे, ते अपयशी ठरले आहेत. नालेसफाई, वीज, आरोग्यव्यवस्था, रस्ते हे पालिकेचे काम आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेले मृत्यू हे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे आहेत. तुमचं लक्ष नाही, तुम्ही बेफिकीर आहात तुम्ही भ्रष्ट आहात. अपघात होतातच कसे? 11 वर्षाचा लहान मुलाचा बळी गेला. तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि मस्तवालपणामुळे हे अपघात झाले आहेत. आणि साटम हसून चेष्टा करतात, याला निर्लज्जपणा म्हणतात. शिव्या खाण्याची तुमची लायकीच आहे. साटम यांना रस्त्यावर लोकांनी तुडवलं पाहिजे. लोकांनी यांना चपला मारायच्या.
गेली तीन महिने तुमच्या हातात पालिका आहे. चार वर्ष तुमच्या हातात प्रशासन होतं. यात शिवसेनेचा संबंध काय? नालेसफाई करण्यासाठी तुम्हाला 25 वर्षांचा इतिहास काढावा लागत असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिका चालवायला नालायक आहात. तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात राज्यच करू नाही शकत. गिरीश महाजन कॅमेरे घेऊन नियंत्रण कक्षात बसले होते, हे त्यांचे काम आहे का? मुंबई महाराष्ट्राची काय नौटंकी सुरू आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला.
View this post on Instagram




























































