
शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानभव परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील मॅनहोलप्रकरणी फक्त आणि फक्त मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा नाही तर नगर विकास मंत्र्यांनी दिला पाहिजे. याप्रकरणी महापौर, उपमहापौर आणि नगरविकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच शहरातील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत मिंधे आणि भाजपचा समाचार घेतला.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काल या दुर्घटनांची टिंगल केल्याचे उघड झाले आहे. त्याचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. हे या सगळ्या गोष्टीची टिंगल उडवत आहेत म्हणजे किती निर्लज्जपणा त्यांच्या रक्तात असावा, ही भाजपची घाणेरडी वृत्ती आहे. कुठचीही दुर्घटना झाली की टिंगल उडवायची, हसायचे आणि निघून जायचं, अशी त्यांची वृत्ती आहे. काल भाजपच्या याच वृत्तीचे दर्शन घडले. भाजपची ही भयानक वृत्ती दिसली आणि मुंबईकरांना जाणवायला लागलं आहे की कोणाच्या हातात ही सत्ता दिली आहे, असा घणाघात त्यांनी केला.
मुंबईत नालेसफाई पूर्णपणे झाली नाही, रस्त्यांची कामदेखील रखडली आहेत. अनेक मॅनहोल, गटार उघडे आहेत. पाणी तुबंल्यानंतर हे पाण्याच्या खाली असलेले मॅनहोल, गटारे दिसेनाशी होतात आणि मग अशा दुर्घटना घडतात. परवा महापौरांच्या समोर जेव्हा महापालिकेचे कर्मचारी पडले, तेव्हा त्यांची विचारपूस करण्याऐवजी महापौरांनी त्याच व्यक्तीवर चौकशी लावली आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर तुम्ही चौकशी लावणार पण स्वतःच्या जबाबदारी बद्दल काय? असा सावलही आदित्य ठाकरे यांनी केला.
100 दिवसात फक्त 100 खोके प्रत्येक खात्यात घ्यायचे, एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे. पण पोलखोल म्हणजे आपण पाहिलं असेल हे मुंबईकरांचे हाल आणि मग काल अमित साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे दोन व्यक्ती गेल्या त्यांची केकली टिंगल, हा निर्लज्जपणा आहे. हे अतिशय भयानक आहे, खरं तर कालच त्यांची पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे होती. पण भाजप आहे अशाच लोकांना प्रमोट करत राहणार, असे ते म्हणाले.
इथे आपण पत्रकार सगळे. तुमची संख्या सत्ताधारी पक्ष आणि मंत्री सगळे जे असतात त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. तसं पाहायला गेलं तर विधिमंडळात एकमेव काम सगळ्यांच असतं ते म्हणजे मंत्र्यांनी तिथे बसून सगळ्या बाजूचे जे जे आमदार बोलतात मग आम्ही असो किंवा सत्ताधारी असो त्यांचे पण आमदार आहेतच ना, त्यांचे पण लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे पण लोक जनतेतून निवडून आलेत किंवा निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने निवडून आलेत. तर त्यांचे जे विषय असतील मग निवडणूक आयोगाचे विषय असतील किंवा जनतेचे विषय असतील हे ऐकून घेण्यासाठी त्यांच्यावर पुढे कारवाई करण्यासाठी मंत्री तर असायला पाहिजेत. पण काही विचारलं की सांगतात सामूहिक जबाबदारी मग एकाच मंत्र्याकडे सगळी जबाबदारी द्या. बाकीच्या कशाला तुम्ही गाड्या आणि बंगले घेऊन फिरताय, असेही ते म्हणाले.
नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते मंत्री गेले दोन दिवसांपासून अधिवेशनात नाहीत. झाड पडलं एक मुलाचा मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये एक माणूस पडला. मात्र, त्यांचे लक्ष नाही. सगळं काही दरेगावमध्ये बसून होत नाही, हे त्यांना आता कळलं पाहिजे. ते मुख्यमंत्रीपदाच्या मागे लागलेले आहेत, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस करत आहेत. खासदार विकत घेत आहेत पण जी त्यांची मुख्य जबाबदारी आहे ती पहिली जबाबदारी म्हणजे जनतेला उत्तर देणं लोकप्रतिनिधींना उत्तर देणं, ती जबाबदारी ते विसरले आहेत. ज्या महानगरपालिका त्यांच्या अखेरीत येतात किंवा त्यांच्या खात्याच्या अखेरीत येतात खातं म्हणजे पैसे खाणं नाही काम करणं असतं ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी होणला.
फक्त आणि फक्त मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा नाही तर नगर विकास मंत्र्यांनी दिला पाहिजे. कारण नगर विकास खातं नगर विकास मंत्र्यांकडे असतं. त्यांनी महानगरपालिकेला पाठबळ दिले पाहिजे. महापौर आता बसलेले आहेत त्यांचा का नाही राजीनामा घ्यायचा? उपमहापौरांचा का नाही राजीनामा घ्यायचा? जर तुम्ही पाहिलं असेल गेले दोन-तीन वर्षापूर्वी म्हणजे हे निवडणुका व्हायच्यापूर्वी जे घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे हे फिरत होते ग्रीन कार्पेट घालून नालेसफाई करत होते, आता ते कुठे आहेत? असा सवालही त्यांनी केला.





























































