रेस्क्यू ऑपरेशन, वसईच्या सकवारमध्ये १३ जणांची सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई पूर्व भागात मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या सकवार भागात धुवाधार पाऊस पडल्यामुळे पुराच्या पाण्यात विरार येथील १३ नागरिक अडकून पडले. या प्रकाराची माहिती वसई-विरार महापालिका प्रशासन आणि तहसील कार्यालयाला मिळाल्यानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून जाऊन पुरात अडकलेल्या या नागरिकांची सुखरूप सुटका केली. हे नागरिक अडकल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होत चालली होती. त्यामुळे बचाव पथकही टेन्शनमध्ये आले होते. मात्र नागरिकांची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.