नववीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वप्नील नामदेव आवकीरकर (14) याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वप्नील आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला असता त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ ठोसेघर येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

स्वप्नील हा आदर्श माध्यमिक विद्यालय ठोसेघर येथे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. तो अभ्यासू, शांत, नम्र आणि होतकरू विद्यार्थी म्हणून शिक्षक व मित्रपरिवारात परिचित होता.