
नेरुळ येथील एलपी जंक्शन येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉर्टसर्किट झाल्यामुळे बेशुद्ध पडलेल्या दोन तरुणींना वाचवणारे शाखाप्रमुख प्रवीण महाले यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. या दोन्ही तरुणींना विजेचा जोरदार धक्का बसल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या. त्यावेळी प्रवीण यांनी आपला जीव धोक्यात घालून या तरुणींना पाण्यातून बाहेर काढून रिक्षातून रुग्णालयात नेले होते.
दोन तरुणींना एलजी जंक्शन येथून आपल्या स्कुटरवरून जात असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉर्टसर्किट झाल्याने
त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे या दोन्ही तरुणी बेशुद्ध होऊन जागीच पाण्यात कोसळल्या. त्यावेळी प्रवीण महाले यांनी क्षणाचाही विलंब न करता या दोन्ही तरुणींना पाण्यातून बाहेर काढले आणि आपल्या रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या तरुणींवर डॉक्टरांना वेळेत उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. प्रवीण महाले यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांनी प्रवीण महाले यांचा सन्मान केला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, शहर संघटक नंदा काटे, विधानसभा संघटक भाग्यश्री पिसाळ, विभागप्रमुख सोपान कंक, मारुती सकपाळ, आदित्य जाधव, उपविभागप्रमुख मारुती मोरे, महेंद्र सुतार, मंदार परब, शाखाप्रमुख अनिल देवरामणी आदी उपस्थित होते.






























































