असं झालं तर… घराचा पत्ता बदललाय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही नवीन घरात राहायला जात असाल, तर तुमच्या बँक खात्याचा पत्ता बदलला पाहिजे. बँक खात्याचा पत्ता बदलला नसल्यास सर्व कागदपत्रे जुन्याच पत्त्यावर वितरित केली जातील.

तुमच्या घराजवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या आणि अर्ज करा. तुम्ही नेट बँकिंग सुविधा वापरूनही पोस्टाने किंवा कुरिअरने तुमचे डेबिट कार्ड मागवू शकता.

खालीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत सोबत ठेवा: आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज किंवा पाणी बिल, शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आदी.

नवीन पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड, लाईट बिल, गॅस बिल किंवा बँक पासबुक). जर चुकीचा किंवा जुना पत्ता रेकॉर्डमध्ये असेल तर तुमच्या मौल्यवान वस्तू हरवू शकतात.

सुरक्षिततेसाठी मूळ कागदपत्रांची स्व-प्रमाणित प्रत सोबत ठेवा. नवीन पत्त्यावर शिफ्ट होण्यापूर्वी तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्ही बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.