
कोल्हापूरातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता संपन्न झाला. त्यामुळे पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. सोमवारी मंदिराच्या चारही बाजूला पुराच्या पाण्याने वेढा घातला आणि मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.




































































