किती हा निर्लज्जपणा! आता हिंदू माफ नाही करणार; आदित्य ठाकरे भाजपवर संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनौ येथील भाजपच्या रोडशोमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या स्वागतासाठी आयोजित रॅलीमध्ये हनुमानाच्या वेषात एका व्यक्ती नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या व्यक्तीच्या हातात भाजपचा झेंडा देखील दिसत आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.

”हनुमानाच्या वेषातील व्यक्तीला भाजपचा झेंडा हातात घेऊन भाजप अध्यक्षांच्या स्वागतासाठी नाचायला लावले हे पाहून धक्का बसला आहे. सरकारने नेमलेल्या विश्वस्तांनी अयोध्येतील राम मंदिराची जी लूट केली आहे, त्यावर भाजप इतकी शांत कशी काय आहे. हे आमच्या सर्वांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. किती हा निर्लज्जपणा! आता हिंदू माफ नाही करणार;