मुंबई आणि नांदेड दरम्यान नियमितपणे दोन साप्ताहिक गाड्या सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या दोन साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) – नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेसची नियमित सेवा उद्यापासून सुरू होईल.

गाडी क्रमांक 17667 हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक 8 जुलैपासून, गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक 9 जुलैपासून, गाडी क्रमांक 17665 हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक 13 जुलैपासून आणि गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक 14 जुलैपासून सुरू होईल.

गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 9 जुलैपासून दर गुरुवारी 16.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी 9.10 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 17667 नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस 8 जुलैपासून पासून दर बुधवारी 21.15 वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबे देण्यात येतील. गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 14 जुलै 2026 पासून दर मंगळवारी 16.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी 9.10 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 17665 नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 13 जुलै 2026 पासून दर सोमवारी 21.15 वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 16.40 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबे देण्यात येतील.