Jammu Kashmir News – शोपियान येथे लश्कराचा प्रमुख दहशतवादी झाकीर गनीला सुरक्षा दलाकडून कंठस्नान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या चकमकीनंतर, बुधवारी लश्कर-ए-तोयबाचा सर्वोच्च कमांडर झाकीर गनी याचा मृतदेह त्याच्या शस्त्रांसह जप्त करण्यात आला. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. शनिवारी सीसीटीव्हीमध्ये दोन दहशतवादी दिसले आणि त्याच दिवशी चकमक सुरू झाली. अखेरीस, चार दिवसांनंतर, ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह शोपियानच्या चानपोरा गावातून ताब्यात घेण्यात आला . शोपियान चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा सर्वोच्च कमांडर झाकीर गनाई ठार झाल्याची आता पुष्टी झाली आहे. त्याचा मृतदेह आज शोपियानमधून ताब्यात घेण्यात आला.

शोपियानमध्ये झालेल्या चकमकीनंतर चार दिवसांनी, ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह त्याच्या शस्त्रासह जप्त करण्यात आला आहे. चकमक सुरू झाली त्याच दिवशी, शनिवारी, दोन दहशतवादी सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. असे वृत्त आज तक ने दिले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुरक्षा दलांनी रविवारी रात्री काही काळ थांबल्यानंतर, पुन्हा लगेचच एक मोठी दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. लश्कर-ए-तोयबाचे (LeT) दोन दहशतवादी एका घनदाट फळांच्या बागेमध्ये लपून बसले होते. या मोहिमेचा हा दुसरा दिवस होता. लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) मीमंदर परिसराभोवतीचा वेढा अधिक कडक केला, होता. याच ठिकाणी शुक्रवारी पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये हे दहशतवादी प्रथम दिसले होते.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सापळ्यात अडकलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख झाकीर आणि लतीफ अशी पटली आहे. दोघेही दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. झाकीर हा 2024 पासून बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे मानले जाते, तर लतीफ गेल्या वर्षी या संघटनेत सामील झाला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर गोळीबार केला, तेव्हा लष्कराने प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली. गोळीबार होऊनही, दोन दहशतवादी बागेत अडकून पडले. तेव्हापासून लष्कर शोधमोहीम राबवत आहे.