
इंदूर ते महू या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेतील एका लोको पायलटने केवळ समोसा खरेदी करण्यासाठी ट्रेन थांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर रेल्वेने याची गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या व्हिडीओमध्ये लोको पायलट ट्रकच्या बाजूला असलेल्या एका दुकानात उभा असून दुकानात समोसे खरेदी करत आहे. नंतर इंजिनकडे जातो. लोको पायलट इंजिनमध्ये चढल्यानंतर रेल्वे सुरू होते. हा व्हिडीओ राऊ येथील रंगवासा रोड येथील आहे. इंदूर-महू डेमू ट्रेन येथे अनेकदा काही मिनिटांसाठी थांबते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

























































