आंध्र प्रदेशात कोरोनाचे रुग्ण वाढले; नव्या रुग्णांची संख्या 12 वर, कडप्पामध्ये विलगीकरण कक्ष उभारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमध्ये कोरोना हातपाय पसरत आहे. राज्याचे आरोग्य आयुक्त जी. वीरपांडियन यांनी माहिती दिली आहे की, २६ जून ते १६ जुलै दरम्यान कोरोनाचे १२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याचा प्रसार वाढू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे.

२६ जून ते १६ जुलै दरम्यान आंध्र प्रदेशात कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. सर्व मृत रुग्णांना आधीपासूनच काही आजार होते. सर्वाधिक रुग्ण कडप्पा जिल्ह्यात आढळले. २६ जून ते १६ जुलै दरम्यान आंध्र प्रदेशात कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले. त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण आधीपासूनच गंभीर आजाराने ग्रस्त होते. कडपा येथील रिम्स रुग्णालयात एक कोविड वॉर्ड आणि विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.

आरोग्य आयुक्तांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या चार रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि मूत्रपिंडाचा आजार यांसारखे आधीपासून असलेले आजार होते. यापैकी तीन रुग्ण कडपा जिल्ह्यातील आणि एक काकीनाडा येथील होता. आंध्र प्रदेशातील २०२६ मधील पहिला कोरोना रुग्ण २६ जून रोजी कडप्पा जिल्ह्यात आढळला. त्यानंतर, १ ते १६ जुलै दरम्यान आणखी ११ रुग्ण आढळले. संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर दोन जण आजारी पडले.

वीरपांडियन यांनी स्पष्ट केले की, हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या विभागांमधून आढळले असून ते कोणत्याही एका भागात एकवटलेले नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, २६ जून ते १५ जुलै दरम्यान राज्यात एकूण ६७ कोविड चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ११ जण पॉझिटिव्ह आढळले. बारावा रुग्ण तामिळनाडूतील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये आढळला. संक्रमित रुग्णांपैकी तीन जण गृह विलगीकरणात आहेत, दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तीन जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.