कुर्ला येथे तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील शीतल तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य तायडे असे या तरुणाचे नाव आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तलावात मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगा सापडला नाही. अखेर एनडीआरएफला पाचारण  करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी तलावात शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर मुलाला बाहेर काढण्यात यश आले. त्याला  राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाने आत्महत्या केली, की घातपात झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.