
1 कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विमा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, परंतु अनेक वेळा विमा पॉलिसी घेण्याच्या प्रक्रियेत लोक फसवणुकीला बळी पडतात.
2 प्रत्येक विमा पंपनीमध्ये तक्रार निवारण अधिकारी असतो. त्या अधिकाऱ्याकडे तक्रार करा. 15 दिवसांच्या आत विमा पंपनीने समस्येचे निराकरण करायला हवे.
3 IRDAI च्या पोर्टलवर IGMS वापरून किंवा [email protected] वर ई-मेलद्वारे तक्रार नोंदवू शकता. आयआरडीएच्या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवता येईल.
4 IRDA मध्येही तक्रार सोडवली गेली नाही तर विमा लोकपालाकडे तक्रार करण्याचा अधिकार असतो. जवळच्या विमा लोकपालाकडे पंपनीबद्दल तक्रार करू शकता.
5 ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करता तेव्हा फॉर्म P-II आणि फॉर्म P-III भरावा लागतो. विमा लोकपाल यांच्या कार्यालयाची माहिती विमा पंपनीच्या शाखेतून किंवा वेबसाईटवरून मिळू शकते.




























































