प्रेमीयुगुलावर उद्यानात हल्ला; तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण पूर्वेतील आडिवली गावात उद्यानात बसलेल्या प्रेमीयुगुलावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात  आला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून यामध्ये अर्जुन काळपांडे ऊर्फ पेंद्या (32) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.