
आंध्र प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. राज्यात 26 जून ते 16 जुलैपर्यंत कोरोनाचे एकूण 12 रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आंध्र प्रदेशचे आरोग्य आयुक्त जी. वीरपांडियन यांनी दिली आहे. कडप्पा जिह्यात कोरोनाचे सर्वाधिक 7 रुग्ण सापडले आहेत.





























































