ताकदीच्या जोरावर निर्लज्जपणे लोकशाहीची मोडतोड केली जातेय, हे जग पाहतंय… आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्ली येथे जंतर मंतरवर उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. देशात ताकदीच्या जोरावर निर्लज्जपणे लोकशाहीची मोडतोड केली जात असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या देशात अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील लोकशाहीला ताकदीच्या आणि बळाच्या जोरावर कशा प्रकारे आणि किती निर्लज्जपणे चिरडले जात आहे, हे संपूर्ण जग पाहत आहे. एका अकार्यक्षम मंत्र्याविरोधात विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने केलेली आंदोलनेही आता या सरकारकडून खपवून घेतली जात नाहीत, अशी संतप्त टिका त्यांनी केली आहे.

Sonam Wangchuk – “20 दिवस बघ्याची भूमिका घेतली, आता आवाक्याबाहेर गेल्याचं लक्षात येताच…”, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा