
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून सशस्त्र दरोडेखोरांनी शिंदे घराण्याची 500 वर्षे जुनी तोफ चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नरवर किल्ल्याच्या खुल्या प्रांगणात एकूण 14 ऐतिहासिक तोफा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता या चोरीनंतर ही संख्या 13 वर आली आहे.
15 जुलैच्या मध्यरात्री 25 ते 30 सशस्त्र दरोडेखोर मागच्या दरवाजातून किल्ल्यात घुसले. हे दरोडेखोर आपल्यासोबत क्रेन आणि ट्रकसारखी अवजड यंत्रसामग्री घेऊन आले होते. त्यांनी 3 हजार किलोग्रॅम वजनाची एक अत्यंत मौल्यवान अष्टधातूची तोफ चोरून नेली. या घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, हल्लेखोर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होते.





























































