सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1200 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 1 हजार 200  कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी तीन हजार कोटी रुपयांची मागणी मंजूर झाली आहे. या मंजूर तरतुदीतील 1200 कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

राज्य सरकारने यापूर्वी  ऑक्टोबर 2025 मध्ये 283 कोटी, डिसेंबर 2025 मध्ये 717 कोटी, फेब्रुवारी 2026 मध्ये 501 कोटी तर मे 2026 मध्ये 396 कोटी असा एकूण 1 हजार 897 कोटी रुपयांचा निधी  कुंभमेळा प्राधिकरणाला दिला आहे.