
>> बद्रीनाथ खंडागळे
पैठणच्या मोक्षघाटावर कावळे फिरकेनासे झाले आहेत… परिणामी ‘दशक्रिया विधी’ साठी येणाऱ्या शोकाकुल आप्तांना पिंडाला ‘काकस्पर्श’ व्हावा, यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खबर (डोक्यावरचे केस काढलेले) केलेले तरुण दुचाकीवरून थेट उघड्यावरच्या मांसविक्री दुकानांच्या परिसरात जातात अन् तेथे पिंड ठेवून कावळा शिवण्यासाठी तासन्तास ताटकळत बसतात… विधींच्या संख्येतील वाढ व गोदावरी नदीचे जलप्रदूषण ही ‘कावळे टंचाईची कारणे सांगितली जातात. मात्र शहरात तब्बल ९ ठिकाणी बेकायदा सुरू असलेल्या उघड्यावरील मांसविक्रीवर ‘काकदृष्टी’ पडल्यामुळे कावळ्यांचे थवे स्थलांतरित झाले असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे!
‘काकस्पर्श’ नंतरच होते दुखवट्याची सांगता
तीर्थक्षेत्र असलेल्या पैठणमध्ये गोदावरी नदी ‘दक्षिण मुखी’ बनलेली आहे. त्यामुळे येथील ‘मोक्षघाट’वर दशक्रिया विधी केल्यास प्रेतात्म्याला मुक्ती मिळते, अशी श्रद्धा असून हिंदूधर्मीयांमध्ये हजारो वर्षांपासून ही रुडी कायम आहे. ४०० वर्षांपूर्वी कमलाकर भट्ट या विद्वानाने ‘निर्णयसिंधू’ या ग्रंथात पैठणच्या दशक्रिया घाटाचे धार्मिक महत्त्व विशद केलेले आहे. अखेरचा व सर्वश्रेष्ठ असलेला हा विधी करताना ‘पिंडाला कावळा शिवणे’ अत्यंत आवश्यक मानलेले आहे. विशेष म्हणजे ‘काकस्पर्श’ पार पडल्यावरच या विधीची सांगता होते व मयताचे आप्तस्वकीय यांची एकत्रित पंगत होते अन् या गोड जेवणानंतर दुखवटघाचीही समाप्ती होते.
मटणाच्या दुकानांसमोरचे वेदनादायी वास्तव
या पार्श्वभूमीवर पैठणच्या मोक्षपाटावर ‘कावळे टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे येणाऱ्या शेकडो शोकाकुल कुटुंबीयांना ‘काकस्पर्श’ साठी तासन्तास धावपळ करावी लागत आहे. पिंडाला कावळा शिवण्याची वाट पहात वाळवंटात आबालवृद्धांना ऊन्हातान्हात ताटकळावे लागत आहे. एवढेच नव्हे तर काही शोकाकुल तरुण चक्क ‘पिंड’ घेऊन शहराच्या विविध भागातील बेकायदा उघड्यावरील मांसविक्री करणाऱ्या दुकानांच्या तसेच मच्छीमार्केटसमोर कावळ्यांची आर्जवे करतानाचे धक्कादायक व वेदनादायी बास्तव समोर आले आहे.
‘काकस्पर्श’ला ‘दर्भा’ चा पर्याय
याबाबत वेदशास्त्रसंपन्न रवी साळजोशी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘सकाळी लवकर पार पडणाऱ्या दशक्रिया विधीप्रसंगी थोडेफार कावळे असतात. दुपारी ११ नंतर मात्र ते दिसेनासे होतात. दुसरे कारण म्हणजे गोदावरी नदीचे जलप्रदूषण आहे. शहरातील ८० टक्के सांडपाणी ९ नाल्याद्वारे नदीत सोडलेले आहे. याशिवाय विधी करणाऱ्यांची संख्या वाढलेली असून त्या तुलनेत कावळ्यांची संख्या कमी पडते. उघड्यावरील मांसविक्री हेसुद्धा एक कारण आहेच, अशा परिस्थितीत ‘काकस्पर्श’ झालाच नाही तर चर्मशास्त्रानुसार नदीतील लव्हाळ्याचा ‘दर्भ’ अर्थात कावळा बनवून त्याची चोच पिंडाला लाऊन विधीची पूर्तता केली जाते.’ असेही रवी साळजोशी यांनी स्पष्ट केले. दरम्यान ‘काकस्पर्श झालाच पाहिजे. अशी श्रद्धा बाळगणाऱ्या काही भाविकांनी थेट मटण अथवा मासळी बाजर गाठल्याचे दिसून आले आहे. पिंडाची चाळी ठेऊन कावळ्यांची बाट पाहणारे शोकमग्न नातेवाईक हा चर्चेचा विषय ठरला आहे.
कावळ्यांचा गोदाकाठी केवळ मुक्कामी वावर
अशा या दशक्रिया विधीबर कावळ्यांच्या टंचाईचे सावट पसरले आहे. जायकवाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या खाली असलेल्या गोदावरी नदीपात्रात तसेच नाथमंदिराच्या मागे असलेल्या मोक्षघाटावर दशक्रिया विधी केले जातात. या दोन्ही परिसरात मोठमोठे वृक्ष आहेत, तेथे सर्वच पक्ष्यांसह कावळ्यांचेही वास्तव्य आहे. दररोज जवळपास १०० मयतांचे दशक्रिया विधी येथे पार पडतात. परंतु गेल्या २ ते ३ वर्षांपासून येथील कावळ्यांची संख्या रोडावत चालली आहे. शहरात अलिकडे सुरू झालेली उघड्यावरची मांसविक्री हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षणांती स्पष्ट झाले आहे. गोदाकाठच्या झाडांवर रात्री थांबणारे कावळ्यांचे थवे दिवसा या रस्त्यावर चाललेल्या मटन मार्केटभोवती ठाण मांडलेले पाहायला मिळतात. रात्री गोदाकाठच्या झार्डावर मुक्काम करणारे कावळ्यांचे थवे दिवसा मात्र पूर्र होत असल्याने दशक्रिया विधी करणाऱ्या शोकाकुल कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


































































