आंदोलक तरुणाने केली पोलिसांची बोलती बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चेंबूरमध्ये आंदोलक तरुणाला रोखणाऱ्या पोलिसाची संबंधित विद्यार्थ्याने चांगलीच बोलती बंद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून विद्यार्थ्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. नीट पेपर फुटीप्रकरणी चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलना दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ‘जमावबंदी असल्याने तुम्हाला इथे थांबता येणार नाही’ असे म्हणत पोलीस आंदोलक तरुणाला हटकताना दिसतोय. त्यावर तरुण म्हणाला, ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार प्रत्येक नागरिकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगत संविधानाने दिलेल्या अधिकाराचे दाखलेच तरुणाने पोलिसाला दिले. आमच्या मूलभूत अधिकारांच्या आड येणार असाल तर विद्यार्थी आवाज उठवणारच. दिल्लीत पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलनकर्त्या तरुणांची डोकी फोडण्यात आली. मुलींना कपडे फाटेपर्यंत मारले. या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे किंवा सरकारकडे आहेत का, असा जाब विचारत त्याने पोलिसाला निरुत्तर केले.