
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थकांनी जल्लोष सुरू केला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आनंद व्यक्त केला. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील पोस्ट सोशल मीडियावरुन हटवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सीजेपीने आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करताना मोदी सरकारवर टीकेच्या पोस्ट तसेच मीम्स शेअर करण्यात आल्या. मात्र, त्या काही मिनिटांमध्ये हटविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय काहींनी आपल्या पोस्ट इतरांना दिसत नसल्याचाही आरोप केला आहे.



























































