
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांना मुंबईसह राज्यभरात सामाजिक संघटना आणि नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना शाखा क्र 131 च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभागप्रमुख अजित गुजर, विधानसभाप्रमुख अवि राऊत, विधानसभा समन्वयक विजय चपटे, शाखाप्रमुख विशाल चावक, शाखा समन्वयक राजेश खरात, उपशाखाप्रमुख राजू राजपुत, अरुण चव्हाण, नितीन गंभीर, उदय पाटील, संदीप मयेकर, मधुकर घोलेकर, अनंत खरात, दर्शन चव्हाण, लौकेश फेपडे, वसंत पाटील, रमेश सावंत, अमोल वांडेकर, स्वप्निल म्हात्रे, मनोज पोटावडे, प्रवीण मुळीक, रमेश गुप्ता आदी उपस्थित होते.
शिवसेना वर्सोवा विधानसभा शाखा क्र 60 च्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य आयुर्वेदिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. उपविभागप्रमुख राजेश शेटये यांच्या पुढाकाराने व शिवसेना आमदार हारून खान, उपनेते अमोल कीर्तिकर याच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर पार पडले. यावेळी उद्योगपती रमेश पिंपळे, पृष्णा पिंपळे, विधानसभा संघटक मेघना माने, जागृती भानजी, सिद्धेश चाचे, अश्विनी खानविलकर, नीलेश देवकर, किशोर नार्वेकर, मोहन चाळके, स्नेहल दळवी, डॉ. नीलेश ढवळे, संजना हरळीकर, ह्रितिक धामणकर, सचिन आंबेकर आदी उपस्थित होते.

























































