
हवामान खात्याने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर जिल्ह्यात दिनांक २८ ते ३० जुलै २०२६ या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपुर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थाना बुधवारी (२९ जुलै २०२६ रोजी) सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत नागपूर शहरात १०८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. नागपुर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार जर अतिमुसळधार पाऊस पडल्यास २९ जुलै रोजी नागपुर जिल्ह्यान अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्याथ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थाना बुधवारी (२९ जुलै २०२६ रोजी) सुटी जाहीर करण्यात आली आहे.
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नागपुर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्याच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण नागपूर शहर व नागपूर शहर लगतच्या तालुका म्हणजेच नागपुर ग्रामीण, हिंगणा, कामठी तालुक्यांमधील क्षेत्रामध्ये (नागपुर महानगरपालिका क्षेत्रा सह) बुधवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.




























































