
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला पाठिंबा दिला आहे. देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळल्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शैक्षणिक व्यवस्थेवरील हल्ल्यावरून संसदेत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने आपल्या दहा वर्षांच्या राजवटीत हिंदुस्थानातील लाखो तरुणांच्या भविष्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. शिक्षण व्यवस्थेचे झालेले बाजारीकरण आणि भ्रष्टाचाराला या स्थितीसाठी त्यांनी जबाबदार धरले. “शैक्षणिक संस्थांमध्ये आरएसएस आणि भाजपच्या विचारांची घुसखोरी केल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे,” अशी टीका खरगे यांनी केली.
याचबरोबर त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि इतर परीक्षांमधील गोंधळाचा मुद्दाही उपस्थित केला. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निराशा निर्माण झाल्याचे ते म्हणाले. सरकारने या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे.
हमारे युवाओं पर, छात्रों पर Pellet Gun से गोली चलाई गई।
या तो ये गृह मंत्री अमित शाह के authorisation से हुआ है, या उनके Top-Down Direction के बिना हुआ है।
दोनों ही scenarios, गृह मंत्री या प्रधानमंत्री की गैर-जिम्मेदारी को दर्शाते हैं।
लोक सभा में श्री @RahulGandhi यही…
— Mallikarjun Kharge (@kharge) July 29, 2026



























































