Ratnagiri News – नाटे येथे घरफोडी करण्याऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राजापूर तालुक्यातील नाटे येथील बंद घर फोडून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत.
नाटे येथे भाड्याने रहाणारे रोशन बच्छाव हे बाहेरगावी गेले असताना बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी नाटे पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना कोल्हापूर हातकणंगले येथून ताब्यात घेतले. विकास पवार वय २३ रा.सांगली आणि संपत पवार वय २० रा.सांगली अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, उपनिरीक्षक संदीप ओगले, हवालदार योगेश नार्वेकर, विजय आंबेकर, दीपराज पाटील आणि अतुल कांबळे यांनी केली आहे.