असं झालं तर… इनअ‍ॅक्टिव्ह पीएफ खात्यातून पैसे काढायचेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरी सोडल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील पैसे काढणे राहून जाते. पीएफ खाते 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस अकार्यक्षम असल्यास पूर्ण रक्कम काढू शकता.

यापेक्षा कमी कालावधी असल्यास अंशतः पैसे काढू शकता. तुमच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी (UAN) पॅन, आधार आणि बँक खाते जोडणे आवश्यक आहे.

ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटला (epfindia.gov.in) भेट द्या. Our Services या विभागात जाऊन For Employees या पर्यायावर क्लिक करा.

सेवांच्या सूचीमधून Claim Form किंवा पोर्टलवरील Member Services पर्याय निवडा. पूर्ण पीएफ काढण्यासाठी Form 19 भरा.

जर तुम्हाला पेन्शनची रक्कम काढायची असेल तर Form 10C निवडा. UAN नंबर, जुना पीएफ अकाऊंट नंबर आदी भरून ओटीपीचा वापर करून फॉर्म सबमिट करा.